व्यक्तिमत्व विकासाची नकारात्मक बाजू

व्यक्तिमत्व विकासाची नकारात्मक बाजू

लेखक : आपले नाव | दिनांक : 28 मे 2025


मनिष इंजिनीरिंगच्या तिसऱ्या वर्ष्याला होता. नुकताच कॉलेजमधल्या एका सेमिनारमध्ये त्याने Personality Development बद्दल ऐकलं होतं.

चांगली नोकरी मिळवण्यासाठी डिग्रीसोबतच Personality Development पण लागते हे त्याला तिथे माहित पडले होते. त्यासाठी ₹ १,५०० फीस घेऊन, कॉलेजनी १५ दिवसांच्या Personality Development च्या Workshop ची घोषणा केली होती.

आधीच कॉलेज ऍडमिशन फीस, लायब्ररी फीस, पार्किंग चार्जेस याचा खर्च खूप होता (कॉलेजमध्ये, गाडीनसतांनाही पार्किंग चार्जेस लागतात हे विषेश !) त्यात आता अजून या Workshop साठी पैसे !

त्याने आपली ही चिंता Class Teacher ला संगितली. Class Teacher नी त्याला Class झाल्यावर स्टाफ रूममध्ये बोलावले आणि बजावून सांगितले की, "तू जर, हा १५ दिवसांचा Personality Development चा Workshop नाही attend केला तर, तुझी ही ४ वर्षांची डिग्री काहीच कामाची नाही !"

नाईलाजाने त्याने Workshop मध्ये भाग घेतला. पहिल्या दिवशी त्याला खूप उत्सुकता झाली की काय शिकवणार, कसं शिकवणार. पण मग त्याला कळून चुकलं आपल्याला नवीन काही नाही, फक्त.. बसायचं कसं, चालायचं कसं, बोलायचं कसं हे शिकवणार आहेत.

"समोर चालून याचा काही फायदा होणारच" अशी समज तो स्वतःला देऊ लागला.

बघा... तुम्हीपण कधी ना कधी मनिष असणारच.

बरेचदा तुम्ही Personality Development च्या नावावर फसले असणार.

खरंतर चुकी त्यांची नाही आपली आहे, कारण... आपलं जे व्यक्तिमत्व बनायला १५ - 20 वर्ष लागलेत, ती १५ दिवसात किंवा १ महिन्यात बदलणे कठीणच !

साहजिकच आहे, एवढ्या लवकर बदल घडून येणे सोपे नाहीच. पण काही संस्था, कॉलेजेस फक्त आणि फक्त काही पैशांसाठी विद्यार्थ्यांना लुबाडतात...

आणि दुसरं म्हणजे... काही (so called) Personality Development चे Classes किंवा Workshop मध्ये ८०% लक्ष फक्त बाह्य व्यक्तिमत्वावर आणि फक्त २०% लक्ष आंतरिक व्यक्तिमत्वावर केंद्रित केले जाते. म्हणजेच जास्त वेळ व्यक्तीला, बोलायचं कसं, चालायचं कसं, कपडे कशे घालायचे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात.

पण, विचार कसा करायचा, कामावर लक्ष कसं केंद्रित करायचं, स्वतःला कसं समजायचं, कठीण काळामध्ये स्वतःला कसं तारायचं इत्यादी, महत्वाच्या गोष्टी कमी किंवा असेल म्हणू शकतो की नाही च्या बरोबर शिकवल्या जातात !

जेव्हा हे Workshop आणि Classes, जास्तीत जास्त लक्ष हे विद्यार्थ्यांच्या आंतरिक व्यक्तिमत्व घडवन्यात लावतील आणि Workshop संपल्यावरही त्यांना सराव करत राहण्यासाठी काही उपक्रम वगैरे देतील... तेव्हा कुठं त्यांची खरोखर Personality Develop होईल !!

पहा... विचार करून पहा!