ऑनलाइन शिक्षण

ऑनलाइन शिक्षण

लेखक : आपले नाव | दिनांक : 28 मे 2025


संध्याकाळची गोष्ट होती. एका काकांसोबत माझं discussion चालू होतं. बोलता - बोलता आम्ही Online शिक्षणाच्या topic वर पोहोचलो, तर त्यांनी आपल्या घराबाजूच्या अमरची गोष्ट सांगितली.

अमर आठवीला होता. त्याचे घरूनच Online Classes चालू होते.

काकांनी मला सांगितलं, त्याच्या (अमर) आईवडीनलांना वाटते की तो Class करत आहे, अभ्यास करत आहे, पण खरं तर तो Mobile वर गेम्स खेळत असतो. ही गोष्ट त्यांना त्यांच्या मुलाकडून कळली होती.

बघा... तशी ही गोष्ट काही नवीन नाही. आपण प्रत्येकानीच लहानपणी ह्या गोष्टी केल्या असतीलच, ही गोष्ट वाईट नाही जोपर्यंत ती Limit मध्ये केली जाणार!

तसेही Whatsapp आल्यापासून आपण आपला जास्त वेळ Status पाहण्यात आणि इकडचं तिकडे करण्यात... म्हणजेच इकडचे message तिकडे Forward करण्यात वेळ घालवतो! यात लहान मुलांपासून, मोठ्या वडिलधाऱ्यांचा समावेश होतो.

"मग काय हे चुकीचे आहे?"

नाही... वरती म्हटल्याप्रमाणे हे वाईट नाही... पण एका limit पर्यंत.

मी इथे तुम्हाला काही facts किंवा आकडे देणार नाही, की लोकं आपला किती टक्के वेळ मोबाईलवर गेम्स खेळण्यात किंवा Social Media वर घालवतात. कारण आपलं आपल्याला माहित आहे.

काम नसतांनाही आपण वारंवार मोबाईल पाहतो - कोणाचा मेसेज तर आला नसणार, माझ्या फोटोला like किती आले असणार, त्याने किंवा तिने काय Status ठेवलं असणार - हे सर्व तेव्हा आपल्या डोक्यात चालू असते.

मोबाईलच्या आतील structure हे अश्याप्रकारे design केलं जाते की, आपण वारंवार त्याच्याकडे आकर्षित होतो. त्यातील Apps सुद्धा आशाप्रकारे design केले जातात की, आपण त्यात गुंतून राहू.

ही झाली मोबाईल रुपी नाण्याची एक बाजू, आता त्याची दुसरी बाजू बघूया...

आधी आपल्याला कोणाला संदेश पोहोचवायचा असला तर पत्र पाठवावे लागत असे, ज्याला पोहोचायला कधी दोन, कधी तीन, तर कधी त्यापेक्षा जास्त पण दिवस लागत असत.

पण आता मोबाईलमुळे काही मिनीटांच्या... मिनिट सोडा, काही सेकंदाच्या आत आपण आपला संदेश जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पाठवू शकतो.

आधी एखाद्या गोष्टी संबंधित माहिती मिळवायची असता, आपल्याला ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचून ती माहिती शोधा लागायची.

आता तीच माहिती बसल्याजागी मोबाईलवर आपण मिळवू शकतो!

तर सांगायचा मुद्दा हाच की, याची चांगली बाजूपण आहे आणि वाईट बाजूसुद्धा. आपण कोणती बाजू पाहतो ते महत्वाचे.

जसं, जेव्हा घरातील लाईट जाते आणि अंधार पडतो किंवा कुठे बाहेर जायचं असेल तेव्हा अंधार असणार तर आपण torch सोबत नेतो. पण जेव्हा उजेड असतो, torch ची आपल्याला गरज नसते तेव्हा आपण तिला व्यवस्थित ठेऊन देतो.

म्हणजेच, जेव्हा गरज असते तेव्हाच आपण torch वापरतो आणि गरज संपली की ठेऊन देतो.

बस तसाच मोबाईल वापरायचा!

जेव्हा गरज असणार - माहिती शोधण्यासाठी, संदेश पाठवण्यासाठी, फोन करण्यासाठी - तेव्हा मोबाईल वापरायचा, गरज संपली की ठेऊन द्यायचा.

लक्षात ठेवा, आपण मालक आहोत आणि मोबाईल नोकर, हे समीकरण उलटं पडू देऊ नका!